Ad will apear here
Next
आयआयटी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत हिरेन बावस्कर देशात चौथा
दापोली : नेरूळ (नवी मुंबई) येथील डीएव्ही पब्लिक स्कूलच्या विज्ञान शाखेचा (सीबीएसई) विद्यार्थी हिरेन बावस्कर याने नुकत्याच झालेल्या आयआयटी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत आरक्षित वर्गात महाराष्ट्रात प्रथम, तर देशात चौथा क्रमांक पटकावून यश संपादन केले आहे.

उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतही त्याने ९७ टक्के गुण मिळविले आहेत. दहावीतदेखील त्याने गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयात प्रत्येकी १०० पैकी १०० मार्क मिळवत एकूण ९९ टक्के गुण प्राप्त केले होते; तसेच तो गणित आणि केव्हीपीवाय ऑलिंपियाडचा विजेता आहे. त्याचे वडील अनिल हेदेखील मुंबईच्या आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत, तर आई डॉ. रंजना ही दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची उद्यानविद्या शाखेची (पदव्युत्तर) सुवर्णपदकविजेती विद्यार्थिनी आणि बेंगळुरू येथील कृषी शास्त्र विद्यापीठाची सुवर्णपदक विजेती पीएचडी विद्यार्थिनी आहे. दापोलीतील राष्ट्रपती पुरस्कारविजेत्या मुख्याध्यापिका प्रभावती जालगावकर यांचा हिरेन हा नातू आहे.

मुंबईच्या आयआयटीमध्ये संगणकशास्त्र अभियांत्रिकी शाखेत उच्च शिक्षण घेण्याचा मानस असल्याचे हिरेनने सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZLGCB
Similar Posts
‘मत्स्य’च्या विद्यार्थ्यांना कोकण कृषी विद्यापीठाच्याच पदव्या मुंबई : महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम १९९८च्या कलम नऊमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ही बैठक चार जून २०१९ला झाली.
‘रत्नागिरी जिल्ह्यातील जेटींच्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा’ मुंबई : ‘दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांतील विविध जेटींची आणि रस्त्यांची कामे, तसेच धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करा,’ अशा सूचना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिल्या आहेत.
‘नापास म्हणजे आयुष्यात अपयशी नव्हे’ रत्नागिरी : ‘विद्यार्थी नापास झाला की त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम नातेवाईक, शेजारी करतात. मग व्यवस्थेलाही दोषी ठरवले जाते. नापास म्हणजे आयुष्यात अपयशी नव्हे, ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मकता वाढवू नका. अपयशाची कारणे शोधून यश मिळवा. स्वराज्य संस्था सकारात्मकता निर्माण
राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत गणेशगुळ्याचा संघ विजेता रत्नागिरी : कल्याण ब्राह्मण सभा संघातर्फे कै. अरुण काणे स्मृती क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील वीर सावरकर संघाने अलिबाग-पेण संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. २१ हजार रुपये व चषक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. अंतिम सामन्यात सामनावीर व मालिकावीराचा मान वीर सावरकर संघाचा कप्तान सौरभ फडके याने पटकावला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language